Latest Marathi News
Ganesh J GIF

हळदीच्या कार्यक्रमात नवरीचा अनोखा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ जोरदार व्हायरल, भर पावसात नवरीचा डान्स पाहून पाहुणे भारावले, एकदा बघाच!

पुणे – उन्हाळा आणि लग्न हे सध्याचे समीकरण आहे. पण सध्या राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक जणांना त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. काही जणांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. पण तरीही काहींनी ठरल्याप्रमाणे लग्न केले. पण या लग्नात एका नवरीचा धमाकेदार व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

एक नवरी भर पावसात हळदीच्या कार्यक्रमात डान्स करत असल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, संपूर्ण वातावरण पावसामुळे भिजून गेलं आहे. मंडपात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत, संपूर्ण मंडप पावसाच्या पाण्यानं गळत आहे. असं असतानाही नवरीच्या उत्साह कायम आहे. नवरी आनंदाने मनोक्त नाचताना दिसत आहे. अनेक भारतीय परंपरांमध्ये, लग्नाच्या दिवशी पाऊस पडणे हा एक शुभ संकेत मानला जातो. लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. त्यात नवरा किंवा नवरीचा डान्स अनेकांच्या आकर्षणाचा विषय असतो. नवरीच्या डान्सचा हा व्हिडिओ @laxmijadhav325 या इन्स्टाग्रामर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेकांची पसंद मिळत आहे.

हळदीसाठी साडीसोबत तिने खास हेअरस्टाईलही केली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याचजणांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, “यालाच म्हणतात रेनडान्स.” दुसऱ्या एका युजरने ‘आयुष्य जगता आलं पाहिजे’, अशी कमेंट केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!