Latest Marathi News

उरुळीत मामाची भाचीला भररस्त्यात कपडे फाडत मारहाण

भाच्याने मुलीला पळवल्याचा राग भाचींवर, पोलीसांकडुन मामा अटकेत

पुणे दि ६(प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमध्ये सख्ख्या मामानेच आपल्या दोन भाचींना भर रस्त्यात विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. पोलीसांनी नराधम मामाला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मामाच्या मुलीबरोबर भाच्याचे प्रेमसंबंध सुरु होते. या प्रेमप्रकरणाला मामाचा विरोध होता. पण विरोधाला न जुमानता त्यांनी पळून जाऊन लग्न केले. त्यामुळे संतापलेल्या मामाने दोन भाचींना भररस्त्यात मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्या मुलींचे कपडे फाडत शिवागाळही केली. पळून गेलेल्या मुलाने आपल्या बहिणींना विवस्त्र करुन झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ माजी उपसभापती हेमलता बडेकर यांना पाठवत न्यायाची मागणी केली. बडेकर यांनीही याची दखल घेत लोणीकाळभोर पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी मामासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून नराधम मामावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पुण्याच्या हद्दवाढ भागात गुन्हेगारी आणि मारहाण धमकीच्या घटना वाढल्या आहेत.आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणारे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!