
फोन पे, गुगल पे युपीआय वापरता का? मग ही बातमी वाचाच
एनपीसीआयकडून डिजिटल व्यवहारावर निर्बंध, या सेवा होणार बंद, 'या' तारखेपासून होणार अंमलबजावणी
पुणे – भारतात कोरोना काळानंतर आॅनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. खासकरून डिजिटल अॅप म्हणजे फोन पे, गुगल पे युपीआय व्यवहाराचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. पण अलीकडे या सेंवावर मोठा ताण येत असल्याने या सेवा बंद पडण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे या सेवा वापरण्यास काही निर्बंध घालण्यात येणार आहेत.
गुगलपे, फोनपे सह अन्य युपीआय पेमेंट अॅप्सवर आता बंधणे येणार आहेत. युपीआय पेमेंट सिस्टीमवर प्रचंड ताण येत असल्याने एनपीसीआय आता बॅलन्स चेक पासून रोजच्या व्यवहारावर बंधने घातली जाणार आहेत. हे नवीन बदल १ आॅगस्टपासून अमलात आणली जाणार आहेत. १ आॅगस्टपासून दिवसातून ५० वेळा बॅलन्स तपासू शकणार आहेत. मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या खात्यांची संख्या देखील दिवसातून २५ वेळापेक्षा जास्त पाहता येणार नाही. तसेच SIP किंवा Netflix चे ऑटो पेमेंट ताण नसलेल्या वेळेत केले जाणार आहे. यासाठी वेळा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. नॉन-पीक अवर्स म्हणजे सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आणि रात्री ९:३० नंतरचा कालावधी या काळात आॅटो पे व्यवहार होणार आहेत. विशेष म्हणजे बँकांना आता ग्राहकांना अपडेट माहिती देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध बॅलन्सची माहिती पाठवतील.हे करणे बँकांना बंधनकारक राहणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. जेणेकरून यूजर्सना वारंवार बॅलन्स तपासण्याची गरज लागणार नाही. या नवीन नियमानंतर युपीआय सेवा बंद पडणार नाही, असा विश्वास एनपीसीआयने व्यक्त केला आहे.
आजकाल बहुतांश जणांच्या मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम सारखे अँप आहेत. सध्या युपीआयवर ४० कोटी लोक व्यवहार करत आहेत. मिनिटभर जरी युपीआय बंद पडले तरी लाखो लोकांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो.