Latest Marathi News
Ganesh J GIF

वाल्मिक कराड भरतो तब्बल इतक्या रूपयांचा इन्कम टॅक्स

मोठा उद्योग, व्यवसाय नसतानाही इतकी माया जमवली कशी? आयकर विभागाकडून माहिती समोर, अडचणीत वाढ

बीड – खंडणी प्रकरणात सध्या अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराड याच्याबाबत दररोज काही ना काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या तो अडचणीत आला आहे. पण आता कोट्यवधी संपत्ती असलेला कराड नेमका किती टॅक्स भरायचा याची माहिती समोर आली आहे. ती अचंबित करणारी आहे.

वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यात तसेच इतर ठिकाणी करोडो रुपयांची संपत्ती असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. तसेच वाल्मिक कराड याची परदेशात संपत्ती असल्याचा संशय सीआयडीला असून याबाबत तपास सुरु आहे. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे काही वर्षांपुर्वी घरगडी असलेला कराड सध्या कोणताही व्यवसाय नसतानाही इतकी मालमत्ता जमवतो कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाल्मिक कराड हा अधिकृतपणे आयकर विभागाकडे वार्षिक किती लाख रुपयांचा कर भरायाचा, याची माहिती समोर आलेली आहे. वाल्मिक कराड आयकर विभागाकडे वार्षिक जवळपास ९६ लाख रुपये कर भरत होता, अशी माहिती समोर आलेली आहे.वऊसतोडीसाठी जिथले मजूर पोटावर संसार बांधत देशभरात जातात त्याच परळीत कोणताही मोठा उद्योग किंवा व्यवसाय नसतानाही वाल्मिक कराड इतकी संपत्ती जमवतो कशी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं बोलले जात आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची देण्यात आली आहे. तसेच मकोका लागू झाल्यामुळे कराडला तात्काळ जामीन मिळणे कठीण असल्याचे मानले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!