वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर आणि संजय राऊत चर्चेत
नक्की काय म्हणाले होते संजय राऊत ही बातमी बघाच
मुंबई दि १७ (प्रतिनिधी) – राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉन हा लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकारण पेटले आहे. त्यावरुन, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशा वेळी संजय राऊत हे सुद्धा चर्चेत आले आहेत. त्यांच्या एका वाक्याची आज अनेकजण आठवण काढत आहेत.
लाखो तरूणांना रोजगार निर्माण करणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याने महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. या सर्व गदारोळात जेलमध्ये असलेले संजय राऊत चर्चेत आले आहेत. आता तुम्ही म्हणाल वेदांता प्रकल्प आणि संजय राऊत यांचा काय संबंध पण अनेक शिवसैनिकांबरोबरच अनेक नेटक-यांनी राऊत यांच्या एका वाक्याचा दाखला देत शिंदे फडणवीस सरकारवर टिका केली आहे.सध्या सोशल मीडियावर त्यांच्याच एका विधानाची चर्चा आहे. पोलिसांनी जेव्हा राऊतांना अटक केली आणि पोलीस त्यांना घेऊन जात होते. तेव्हा जाता जाता संजय राऊतांनी एक विधान केलं होतं की, “पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमकुवत होतोय.” याच विधानाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनीही याविषयी ट्वीट केलं आहे. महाराष्ट्र तुम्हाला मिस करतोय. कारण आता महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहे. अशावेळी सकाळी संध्याकाळी तुमचा कडक आवाजातला होणारा विरोध खूप महत्त्वाचा आहे, असं ट्वीट कुचिक यांनी केलं आहे. तर महाराष्ट्र कमजोर होतोय हे संजय राऊतांचं विधान आता खरं ठरत असल्याची प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिलं आहे.
तब्बल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून सुमारे दीड लाख नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तळेगावला होणार होता पण आता तो गुजरातला गेल्याने संजय राऊतांचे ते वाक्य खरे ठरत असल्याची भावना नेटकरी व्यक्त करत आहेत.