Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यातील या महिला पोलिसाने भर पावसात केले असे काम

व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल सलाम महाराष्ट्र पोलीस

पुणे दि १७ (प्रतिनिधी) – सध्या पुण्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना खड्डे किंवा चेंबर दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.अशातच पुण्यातील एक महिला पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.ड्युटी करत असताना सामाजिक भान जपल्याबद्दल अनेकांनी त्या महिला पोलीसाचे काैतुक केले आहे.

सहकारनगर वाहतूक विभागात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस नाईक साबळे या आपली ड्युटी करत असताना रोडवरील पाणी ड्रेनेजमध्ये न जाता रस्त्यावरच थांबत होते. त्यापाहिले असता त्यांना ड्रेनेजमध्ये कचरा अडकल्याचे दिसले त्यांनी तातडीने पाण्याला वाट करुन देण्यासाठी ड्रेनेजवर अडकलेला कचरा त्यांनी स्वतः स्वच्छ केला. हाती लागेल त्या वस्तूने त्यांनी पाणी जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिला पोलिसावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. पुण्यात दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

पोलिसांचे यापूर्वीही अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पोलीसांनी पुढाकार घेत स्वतः रोडवरील खड्डे बुजवले आहेत.तर अनेकदा स्वतः हातात फावडे घेऊन रस्ता बुजवण्यात सहकार्य केले आहे. आता याही महिला पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांचे काैतुक केले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!