Latest Marathi News
Ganesh J GIF

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केली कमाल

गुंतागुंतीची बेंटॉल शस्त्रक्रियेने रुग्णाला दिले जीवनदान

पुणे दि २६ (प्रतिनिधी)-  हदय रोग शस्त्रक्रियेमध्ये सतत येणारे नव्या तंत्रज्ञानामुळे बेंटॉल सर्जरी (बेंटॉल हे शास्त्रज्ञाचे नाव आहे) पुण्यात विश्वराज हॉस्पिटलमध्ये प्रथमच करण्यात आली आहे. या मुळे एका रुग्णाची ओपन हार्ट सर्जरी करणे अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ केस आहे. शहरातील लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या कार्डियक टीम ने या रुग्णाला नवे जीवनदान देण्यास यशस्वी झाले आहे.

अर्जुन रामदास चौगुले (वयः ४७, निवासः सांगोला, महीम) यांच्या हदयाच्या झडपेतून संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पोहचविणारी धमनी कमकुवत झाली होती. तिचा आकार ३ सेमी पासून वाढत जाऊन ८ सेमी पर्यंत पोहचला होता. रुग्णाला ब्लडप्रेशन असल्यामुळे ही फुटण्याची भिती अधिक होती. तसेच हदयाची झडप वॉल काम करीत नव्हते, त्यामुळे दबाव वाढतच चालला होता. त्यातच रक्ताची गुठळी तयार होत असल्याने ती शरीरात कुठेही जाण्याची भिती निर्माण झाली होती. या सर्व गोष्टींचा विचार करता विश्वराज हॉस्पिटलच्या कार्डिक विभागाने तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

प्रख्यात हदयरोग शल्यचिकित्सक डॉ. सूरज चव्हाण व हदयरोग तज्ञ डॉ. सूरज इंगोले यांच्या टीम ने रुग्णाची सर्व तपासणी केल्यानंतर त्यांची किडणी व लिवरची तपासणी केली. रूग्णाचेे ब्लड प्रेशर नियंत्रित केले. नंतर डॉक्टरांच्या अथक १४ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवे जीवन दिले. डॉक्टरांच्या या टीम मध्ये भूलतज्ञ डॉ. संग्राम घाडगे, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. विजय खंडाळे आणि डॉ संचिन कतकडे यांचा समावेश होता. विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड, मुख्य व्यवस्थापक डॉ. सुधीर चंद्राउत्तम आणि व्यवस्थापकीय अधिकारी डॉ. तबरेज पठाण यांनी डॉक्टरांच्या टीमचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सुरज इंगोले यांनी सांगितले की,“ बेंटॉल शस्त्रक्रियेचा शोध ७ वर्षापूर्वी लागला आहे. ही दुर्मिळ शस्त्रक्रिया असून अतिशय गुंतागुंतीची असते. यामध्ये ऑपरेशन केल्यानंतर रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधोपचार केल्यास १० वर्षापर्यंत रुग्णाला काहीच होत नाही. अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याने यातील ४० टक्के रुग्ण दगाविण्याची भिती अधिक असते.”

या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे जेनेटिक नुसार, झडप लिक होणे, व्यक्तीला दम लागणे व थकवा अधिक लागणे, धडधड वाढते आणि त्यातुनच नस फुटण्याची भिती अधिक वाढते. या संबंधीची तपासणी केल्यानंतर रुग्णाला हा आजार आहे का नाही हे कळते. हा आजार मुख्यता वयवर्षे २० पासून कोणत्याही वयापर्यंत होत आहे. महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हा आजार अधिक होण्याची संभावना आहे. शस्त्रक्रियेनंतर ही २ टक्के रुग्णांना पुन्हा हे होण्याचे प्रमाण आहे. “ गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉ. चव्हाण यांनी रुग्णाला जीवनदान दिले आहे. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांचा वापर करून रूग्णांना परवडणारी सेवा देणे हेच आमचे कर्तव्य आहे.” असे डाॅ अदिती कराड म्हणाल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!