Latest Marathi News
Ganesh J GIF

राज्यात तलाठ्यापासून सचिवापर्यंत बदलीसाठी कोट्यावधींचे दर पत्रक

गुड गव्हर्नंन्सच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे कुरण, राजू शेट्टींनी पोस्टींगचे दरच सांगितले

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन वर्ष होत आले असताना अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यात आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रालयात बदल्यांचे रेट कार्ट तयार केले असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला पत्र पाठवले आहे.

सर्वसामान्य जनतेचे सरकारी कार्यालयात गेल्यानंतर लचके तोडून त्यांना शासकीय कामे करून देत असताना नागवला जात आहे. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत टीका केली आहे. ते म्हणाले, “काहीं वर्षांपूर्वी महसूल, गृह व सार्वजनिक बांधकाम विभाग ही भ्रष्ट्राचाराची कुरण असलेली खाती म्हणून ओळखली जायची. पण आज महसूल, बांधकाम, नगरविकास, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, ग्रामविकास, सहकार, गृह, जलसंपदा, वने, उत्पादन शुल्क, परिवहन यासह शासनाच्या कार्यालयीन कामकाजात अस्तित्वात असलेल्या जवळपास ५२ विभागातील अधिकारी यामध्ये  तलाठी ग्रामसेवकापासून ते मंत्रालयीन सचिवापर्यंत सर्वच विभागामध्ये जनतेची अडवणूक करून आर्थिक पिळवणूक केली जात आहे. आज या व्यवस्थेमध्ये ग्रामसेवक म्हणतो मी दोन लाख दिले आहेत. तलाठी म्हणतो मी ५ लाख देवून पोस्टिंग घेतलं आहे. पोलीस निरीक्षक म्हणतो मी २५ लाख दिले आहेत. तहसिलदार म्हणतो मी ५० लाख ते १ कोटी दिले आहेत. कृषी अधिक्षक म्हणतो मी ३० लाख दिले आहेत. प्रांत म्हणतो मी दिड कोटी दिले आहेत. आर.टी.ओ म्हणतो मी २ कोटी दिले आहेत. जिल्हाधिकारी म्हणतो मी कोटी दिले आहेत. पोलिस अधीक्षक म्हणतो मी ५ कोटी दिले. तर, नगररचना विभागातील सहाय्यक संचालक म्हणतो मी ३ कोटी दिले आहेत. आयुक्त म्हणतो मी १५ कोटी दिले आहेत. सचिव म्हणतात मलईदार विभागासाठी २५ ते ५० कोटी द्यावे लागतात, मग राज्यातील ५२ विभागातील जवळपास १७ लाख कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून येणारा एवढा अमाप पैसा कोणाकडं व कशासाठी जात आहे? असा सवालही शेट्टींनी उपस्थित केला आहे. ही बरबटलेली व्यवस्था सुधारायची असेल तर फक्त देशातील ५४२ लोक व राज्यातील २८८ लोकांनी ठरवलं तर शक्य होवू शकते असेही शेट्टी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

“गुड गव्हर्नंन्स”चा व भ्रष्ट्राचारमुक्त कारभाराचा बोलबाला काय कामाचा. हे फक्त बदल्यांच झाल त्याबरोबरच एखाद्या विशिष्ट फायद्यासाठी शासन निर्णय करणे, एफएसआय, जागांचे आरक्षण, सरकारी जागेंची विक्री, अनुदान वाटप यामधील आर्थिक तडजोडीचे आकडे तर चक्रावणारे असतात. असाही आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!