मी दलित समाजातील असल्यामुळेच मला मारहाण झाली का?
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा दावा, प्रियंका गांधीच्या निकटवर्तीवर मोठा आरोप, अभिनेत्री सोबत काय घडले?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राजकीय पक्ष आणि सेलिब्रेटी यांचे जवळचे नाते राहिले आहे. अनेक राजकीय पक्षात अनेक तारे तारका आहेत. पण आता एक वेगळीच घटना समोर आली आहे. खतरों के खिलाडी आणि बिग बॉसमधील अभिनेत्री अर्चना गौतमला काँग्रेस कार्यालयाबाहेर काही महिलांनी शिवीगाळ करत धक्काबाकी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.
अर्चना गाैतमला महिलांनी कार्यालयाबाहेरुन हुसकावून लावले. अर्चनासोबत घडलेल्या प्रकाराने सध्या सर्वत्र खळबळ उडाली होती. पण याप्रकरणी अर्चनाने पोलिसांत तक्रार दिलेली नाही. पण तिने तिची बाजू मांडत काही गंभीर आरोप केले आहेत. अर्चनाने प्रियंका गांधीच्या पीए विरोधात गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली. मी वर्षभरापासून काँग्रेस मुख्यालयाला भेट दिली नव्हती, त्यामुळे जायचं ठरवले होते. त्याठिकाणी मी येणार आहे. याची माहिती फक्त पीए ठाकूर संदीप सिंह यांना होती. पण तिथे पोहोचताच त्या महिला मला मारू लागल्या. ते सगळे संदीप सिंह यांच्या सांगण्यावरून मला मारत होते. असा दावा तिने केला आहे. पण यापुढे बोलताना ती म्हणाली की, मला वाटतं त्यांना माझी अडचण नाही तर माझ्या जातीची अडचण आहे. एक दलित समाजाची मुलगी खूप पुढे जातेय, लोकांना प्रेरित करतेय, हे त्यांना बघवत नाहीये. हे चुकीचं आहे, त्यांनी असं करायला नको होत. माझ्याबरोबर घडलेल्या प्रकाराची माहिती प्रियांका गांधी, राहुल गांधी व सोनिया गांधींना कळावी, असं मला वाटतं. त्यांनी याची दखल घेऊन समिती स्थापन करून चौकशी करायला लावावी अशी माझी विनंती आहे. असे ती म्हणाली आहे.
बाबासाहेबांनी पाण्यासाठी चळवळ केली होती, ते माझे पूर्वज आहेत, मी हार मानणार नाही. दलित मुलींवर अत्याचार झाले की हे सगळे आंदोलन करतात. पण हे माझ्याबरोबर घडतंय, आता मी गप्प बसणार नाही. असेही ती म्हणाली. आता या प्रकरणी पक्ष काय करणार हे पहावे लागणार आहे.