Latest Marathi News
Ganesh J GIF

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायत निवडणुकीचा उडणार धुरळा, तुमच्या जिल्ह्यातील किती गावात निवडणुक?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.निवडणुकीसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवाळीत राजकीय फटाके फुटणार आहेत.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत आहे. पण लवकरच ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा उडणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. मात्र नक्षलग्रस्त गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे. अनेक जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. तर काही ठिकाणी पोटनिवडणूक प्रस्तावित आहे. त्यामुळे राज्यात दिवाळीआधीच राजकीय फटाके फुटणार आहेत. दरम्यान राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने आता महापालिका निवडणुका कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण ओबीसी आरक्षण आणि वार्ड रचना यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याने निवडणूका लांबल्या आहेत. त्या कधी होणार याची अजूनही शाश्वती नाही.

कोरोनाची साथ आल्यामुळे राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. यामध्ये मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!