Latest Marathi News
Ganesh J GIF

पाकिस्तानी हेर ज्योती मल्होत्राला दानिशने बनवले होते हनी ट्रॅप?

धक्कादायक माहिती उघड, ज्योतीमुळे आता ही युट्युबर आली अडचणीत? हेरगिरी प्रकरणात ट्विस्ट

दिल्ली – पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण ज्योतीचे पाकिस्तान नंतर चीनसोबतही संबंध असल्याचे उघड झाले आहे. यामुळे या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

दोन दिवसांपूर्वी मूळची हरियाणाच्या हिसारची असणारी ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केली. भारताबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ज्योतीवर असून तिची कसून चौकशी केली जात आहे. ज्योती मल्होत्रानं या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दूतावासातील तत्कालीन अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिश यानं आपल्याला या पार्टीसाठी विशेष आमंत्रित केल्याचंही म्हटलं आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये दानिशच ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील उच्चपदस्थांशी ओळख करून देत असल्याचंही दिसून येत आहे. भारतीय युटूबर म्हणून ओळखली जाणारी ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणातील आरोपी असून ज्योतीची यूट्यूबर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशातील पुरीत कसून चौकशी सुरु आहे. कुरूक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली. तर इतर इन्फ्ल्यूएन्झर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरत होते. तसेच पाकिस्तानसह चीनलाही ज्योती मल्होत्रा जाऊन आली आहे. यासंदर्भात सखोल चौकशी सुरु आहे. त्यामुळे ज्योती मल्होत्रा फक्त पाकिस्तानची हेरगिरी नसून चीनसोबत ही तिचे संबंध असल्याचे म्हंटले जात आहे. पाकिस्तानी अधिकारी दानिश अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर च्या संपर्कात असल्याचे चौकशी मध्ये समोर आले आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणारा अधिकारी दानिशनं ज्योतीची आणखी दोघांशी ओळख करून दिली. या तिघांशीही ज्योतीचे चांगले संबंध होते. आत्तापर्यंत ज्योती चार वेळा पाकिस्तानमध्ये गेली यावेळी ती कोणाकोणाला भेटली, एसआयला गोपनीय माहिती पुरवण्यामध्ये तिच्यासोबत आणखी कोण कोण सामील आहे ? यासंदर्भात तिला विचारणा करण्यात येतेय. त्यामुळे या चौकशीदरम्यान आणखी काय नवीन खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ज्योती आणि दानिश यांच्यात प्रेमसंबंध असल्याचाही दावा करण्यात येत आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. तिथे तिची दानिशसोबत भेट झाली. ज्योतीने दानिशचा मोबाइल नंबर घेतला होता. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि घनिष्ठ संबंध निर्माण झाले. ती पाकिस्तानात गेली तेव्हा दानिशच्या सांगण्यावरून अली अहवानला भेटली. तिथे अलीनेच तिच्या राहण्याची, जेवणाची आणि फिरण्याची व्यवस्था केली होती.

पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योतीच्या संपर्कात प्रियंका सेनापती आल्याचे बोलले जात आहे. यातच तपास यंत्रणांना संशय आहे की या दोघींमध्ये व्यावसायिक किंवा वैयक्तिक पातळीवर काही संबंध होते. या संदर्भात, पुरी पोलिसांसह गुप्तचर विभागाने प्रियांकाची चौकशी सुरु केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!