Just another WordPress site

‘आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाहीत’

भाजप समर्थक आमदारावर शिंदे समर्थक आमदाराची सडकून टिका

मुंबई दि २७(प्रतिनिधी) – मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैया, पैसा सबका रुपया,’ असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला होता. राणा यांच्या टिकेला उत्तर देताना बच्चू कडूंनी वादग्रस्त विधान केले आहे. ‘अबे हरामखोराची औलाद…आम्ही जर गुवाहटीला गेलो नसतो तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता. तू आता मंत्रिपदाच्या शर्यतीत रांग लावून आहे,’ असं विधान त्यांनी केल आहे. आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाहीत, असा टोलाही कडू यांनी रवि राणांना लगावला आहे.

भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या आमदार रवि राणा यांचा कडू यांनी खरपूस समाचार घेतला आहे. आमदार रवि राणा यांनी दहीहंडी कार्यक्रमात कडू यांच्या मतदारसंघात जात गुवाहटी म्हणत बच्चू कडूंना डिवचलं होतं.त्याला बच्चू कडू यांनी जहरी टिका केली आहे. तू मंत्रिपदाच्या शर्यतीत आम्ही गुवाहाटीला गेलो होतो म्हणून आहेस अस म्हणत पुरावे द्या अस प्रत्युत्तर दिल आहे. यावेळी त्यांनी खासदार नवनीत राणा यांचा उल्लेख करत राणा दांपत्यावर जोरदार टिका केली आहे. त्याचबरोबर कडू यांनी विरोधकांनाही टोला लगावला आहे. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर कारवाई करा. असं नामर्दांसारखं वक्तव्य का करत आहात? मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या’, असं आव्हानच आमदार कडूं यांनी विरोधकांना दिलं आहे.

GIF Advt

बच्चू कडू मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत पण विरोधकांनी ५० खोके म्हणत बंडखोर आमदारांना लक्ष्य केल होते. तर राणा दांपत्याने थेट बच्चू कडू यांच्या मतदारसंघात त्यांना आव्हान दिले होते. त्याला कडूंनी जबरी टिका करत प्रत्युत्तर दिल आहे. आता राणा दांपत्य यावर कोणती प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!