Latest Marathi News
Ganesh J GIF

 ‘संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही’

मराठा क्रांती मोर्चाची भुमिका, राज्य सरकारलाही दिला इशारा

मुंबई दि २७ (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही भूमिका मांडली आहे. बैठक वांझोटी ठरल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे ओैरंगाबादमधील पदाधिका-यांनी आपली भुमिका जाहीर केली आहे ते म्हणाले की, “छत्रपती शंभाजीराजे आमचं नेतृत्व करु शकत नाहीत. ते गादी आहेत त्या गादीचा आम्ही मान ठेवतो पण त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा डाव रचला आहे, मराठा समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी संभाजीराजेंना कोणी दिली? ते आम्हाला मान्य नाही. आम्ही यापूर्वीही सांगितलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचं नेतृत्व आहेत. मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व कोणाचं नाही. जर व्यवस्थित चर्चा होणार नसेल आणि जवळचा माणूस हाताशी धरुन जर तुम्ही आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेणार असाल तर तुमची पळता भुई थोडी करु” असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीवरही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.तुम्ही रात्रीच्या अंधारात बैठक घेता, हे काय चाललं आहे. सर्वव्यापक बैठक का घेत नाहीत. अचानक दोन दिवसात बैठक का बोलवता? त्या बैठकीला व्यापक बैठकीचं स्वरुप देता. मोजके चेहरे गोळा करता आणि काय चर्चा करता? सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा करा असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!