Latest Marathi News

‘त्या’ सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो होतो’

शिंदे गटातील या आमदाराचे खळबळजनक विधान, केला हा गाैप्यस्फोट

नाशिक दि २४(प्रतिनिधी) – दसरा मेळाव्यासाठी प्रयत्न करूनही शिंदे गटाला शिवाजी पार्क न मिळाल्याने शिंदे गट आता बीकेसीवर दसरा मेळाव्याची तयारी करणार आहे. आजवरचा सर्वात भव्य दसरा मेळावा होणार असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. याच्या नियोजनासाठी नाशिकमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आमदार सुहास कांदे यांनी धक्कादायक विधान केले आहे.

नियोजन बैठकीत पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सुहास कांदे म्हणाले की, आपल्याला मुंबईतील BKC मैदानावर जायचे आहे. शिवतीर्थापेक्षा बीकेसीचं मैदान दुप्पट मोठं आहे. आपल्याला मैदान भरवायचं आहे. ठाण्यात जशी ताकद, तशीच नाशिकमध्ये ताकद आहे. पालघरमध्ये साधुंना मारलं, तेव्हा आम्हाला गप्प बसावं लागलं होतं कारण सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो, हिजडे झालो होतो, म्हणून हा निर्णय घेतला. जाताना विधान परिषदेला २ आमदार आम्ही निवडून दिले, खोका तर सोडाच कुणाचाही साधा चहा देखील घेतला नाही”, असं कांदे म्हणाले आहेत.यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टिका करताना आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा केला आहे.शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही उठाव केल्याचाही पुनरूच्चार कांदे यांनी केला आहे.

या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण कांदे यांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. यावेळी कांदे यांनी २०२४ साली भुजबळांच्या मुलाला निवडून आणण्यासाठी शिवसेनेतील काही नेते राष्ट्रवादीला मदत करत होते. असा गाैप्यस्फोट करत शिवसेनेतील वरिष्ठ नृत्यावर निशाना साधला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!