Latest Marathi News

महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांच्या संपत्तीत तब्बल इतक्या कोटींची वाढ

पहा किती वाढली संपत्ती, जनतेत विरोधात बोलणा-यांचे संपत्तीवाढीत हातात हात

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- कोणताही नेता असो एकदा का तो निवडणूक जिंकला की त्याची संपत्ती प्रचंड वेगाने वाढते असे बोलले जाते पण समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकणार्‍या ७१ खासदारांच्‍या संपत्तीमध्‍ये तब्‍बल २८६ टक्‍के वाढ झाली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस म्हणजे एडीआरच्या समोर आलेल्या अहवालानुसार प्रत्‍येक खासदाराची संपत्ती सरासरी १७.५९ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. देशात २००९ ते २०१९ असे सलग तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकणार्‍या अपक्षांसह विविध पक्षांच्‍या उमेदवारांची सरासरी संपत्ती ६.१५ कोटी रुपये इतकी होती. २०१४ मध्‍ये सलग दुसर्‍यांदा निवडणूक जिंकलेल्‍या खासदारांच्या संपत्तीमध्‍ये १६.२३ कोटी रुपयांनी वाढ झाली. तर मागील म्‍हणजे २०१९ लोकसभा निवडणुकीत सलग तिसर्‍या निवडणूक जिंकलेल्‍या ७१ खासदारांच्‍या संपत्तीमध्‍ये सरासरी २३.७५कोटी रुपये वाढली आहे. प्रथम क्रमांकावर शिरोमणी अकाली दलाच्‍या भठिंडा मतदारसंघाच्‍या खासदार हरसिमरत कौर बादल आहेत. कारण २००९ मध्ये त्यांची संपत्ती ६०.३१ कोटी रुपये होती. ती २०१९ मध्‍ये ती २१७.९९ कोटी रुपये झाली होती. म्हणजे त्यांच्या संपत्तीत १५७.६८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या यादीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. सुळे यांची संपत्ती २००९ मध्‍ये ५१.५३ कोटी रुपये इतकी होती, तर २०१९ मध्‍ये ही संपत्ती १४०.८८ कोटी इतकी झाली आहे. सुळे यांच्‍या संपत्तीमध्‍ये ८९.३५ कोटी रुपये इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे.

तीनवेळा खासदार म्हणून निवडणूक येऊन संपत्ती वाढलेल्या यादीत भाजपाचे ४३ खासदार आहेत. संपत्ती वाढीमध्‍ये दुसर्‍या स्‍थानावर काँग्रेसचे दहा खासदार आहेत. तिसर्‍या स्‍थानांवर तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. तृणमूलच्‍या ७ खासदारांच्‍या संपत्तीमध्‍ये सरासरी पाच कोटींची वाढ झाली आहे. तसेज बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्‍येकी दोन खासदार देखिल या यादीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!