Latest Marathi News
Ganesh J GIF

चालकाने धावत्या बसमधून उडी मारत वाचवला विद्यार्थ्यांचा जीव

सहलीला जात असलेल्या बसचे ब्रेक फेल, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे दि ५(प्रतिनिधी)- बारामती येथे एक मोठी दुर्घटना टळली आहे. बारामतीतील मोरगाव येथून एका खासगी शाळेतील ३४ विद्यार्थी बसमधून प्रवास करत होते. सहलीला जात होते. पुण्यातील भोर शहरातील चौपाटी परिसरात अचानक बसचा ब्रेक निकामी झाला, मात्र चालकाने चतुराईने मोठा अपघात टळला आहे.

ब्रेक फेल झाल्यानंतरचा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मोरगावमधील खासगी क्लासच्या 34 विद्यार्थ्यांना घेऊन बस क्रमांक MH12 HC9119 ही भोर वरंधघाट मार्गे रायगडला निघाली होती. मांढरदेवीचं दर्शन घेतल्यानंतर भोरच्या चौपाटी जवळ बसचा ब्रेक एअर पाईप फुटल्यान बसचे ब्रेक निकामी झाले. बसचं ब्रेक फेल झाल्याचं लक्षात येताच चालकाने धावत्या बसमधून उडी मारून बसच्या चाकाखाली दगड टाकल्यानं बसवर नियंत्रण मिळवण शक्य झाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३४ विद्यार्थांचा जीव वाचला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाहीत. बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुखरुप आहेत. चालकाचे काैतुक होत आहे.

 

बारामती तालुक्यात इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा ३१ डिसेंबरला अपघात झाला होता. इचलकरंजी येथून शाळेतील आठवी आणि दहावीच्या विद्यार्थिनींना घेऊन ही बस शिर्डी-औरंगाबाद सहलीला निघाली होती. यावेळी झालेल्या अपघातात २७ मुली जखमी झाल्या होत्या. पण आज सुदैवाने जिवितहानी टळली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!