मुंबई दि ४ (प्रतिनिधी) – आपल्या विविध वक्तव्यांमुळे आणि गाण्यांमुळे अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची पत्नी एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही. त्यांची गाणी प्रदर्शित झाल्यानंतर त्या चर्चेत येत असतात पण आता त्या एका कार्यक्रमातील वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, “मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतिक आहे. ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला असतं वाटतं, त्यामुळे मी मंगळसूत्र हातात घालते. त्यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे”, असं वाटत असल्याच सांगितल. याच कार्यक्रमात त्यांना चेहऱ्याच्या प्लास्टिक सर्जरीबाबतही विचारण्यात आलं होतं. तुम्ही चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केलीय का ओ मॅडम? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मला यावरुन अनेक लोक सोशल मीडियावर ट्रोल करतात.प्लास्टिक सर्जरी ही खूप महागडी गोष्ट आहे. त्यामध्ये मोठा धोका असतो. काही बिघडलं तर तुमच्या चेहऱ्याची सगळी फिचर्स बिघडू शकतात. मी लग्नापूर्वी एकदाही ब्युटी पार्लरमध्ये गेली नव्हते. फक्त लग्नाच्यावेळीच मेकअप केला होता, असा दावा केला आहे.
या कार्यक्रमात सामान्य प्रेक्षक महिला आलेल्या सेलिब्रेटी पाहुणीला भन्नाट प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात.या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.त्या भागालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता.