Just another WordPress site

प्रेम फुलत असताना धर्म आडवा आला आणि नको ते घडल..

टोकाचे पाऊल उचलल्याने सोलापूर जिल्ह्यात उडाली खळबळ

सोलापूर दि १३ (प्रतिनिधी) – सध्या राज्यात लव्ह जिहाद वरुन चांगलेच वातावरण पेटले आहे. देशातही अनेक नवीन घटना समोर येत आहेत. आता सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमात धर्म आडवा येत असल्यामुळे हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

GIF Advt

आमचं प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात घडली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ गावातील गणेश विद्यालयात मागील वर्षी इयत्ता १२ वीत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळालेली प्रांजली भारत सुतार आणि विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ‘आमचं प्रेम समाजाला मान्य नाही… आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये’, असा मजकूर चिठ्ठीत लिहीत त्यांनी आत्महत्या केली. पोलीसांनी त्या चिठ्ठ्या ताब्यात घेतल्या आहेत.दोन्ही मृतदेह खाली उतरविले त्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत.

राज्यात एकीकडे लव्ह जिहाद विविध प्रकरणाने वातावरण ढवळून निघत असतानाच सोलापुरात हिंदू मुलगी आणि मुस्लिम पुरुषाने प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.याबाबतची नोंद तालुका पोलीस ठाणे येथे झाली आहे. प्रांजली सुतार अभ्यासात हुशार होती. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!