Latest Marathi News
Ganesh J GIF

लिफ्टची वाट पाहताना तरुण खाली कोसळला आणि…

धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल, बघा तरुणासोबत नक्की काय घडले

दिल्ली दि ५(प्रतिनिधी)- आजकाल सोशल मिडीयावर असे अनेक व्हिडिओ पाहयला मिळत आहेत ज्यामध्ये तरुणांपासून ते वृद्धापर्यंत अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्रकार घडले आहेत. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एकावर अचानक काळाने झडप घातल्याचे पहायला मिळाले.

एक व्यक्ती घरातून तयार होऊन ऑफिससाठी निघला होता. त्याच्या हातात एक बॅगही होती. त्यानंतर तो लिफ्टजवळ आला आणि आपल्या मजल्यावर लिफ्ट येण्याची वाट पाहतो. पण अचानक त्याची तब्येत बिघडू लागते. ती व्यक्ती बॅग जमिनीवर ठेवते आणि काही वेळ जरा हवा घेण्यासाठी इमारतीच्या खिडकीतून बाहेर पाहतो. पण त्याचवेळी त्याला चक्कर येते, आणि तो खाली कोसळतो आणि त्यातच मृत्यू होतो. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर @ajaychauhan41 नावाच्या प्रोफाइलवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे.

हृदयविकाराने मृत्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कधी जिममध्ये व्यायाम करताना, कधी नाचताना तर कधी अचानकपणे हार्ट अटॅक येऊन लोकांचा जीव जात आहे. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचताना एका १९ वर्षाखालील तरुणाचा अचानक मृत्यू झालेला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!