या अभिनेत्रीच्या घरी लवकरच वाजणार सनई चाैघडे
सोशल मिडीयावरील पोस्टमुळे चर्चांना उधान, चाहते खुश, नेटकरी कमेंट करताना सुसाट
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत येणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी हिंदी प्रमाणे हा शो देखील वादात असतो. यात चाैथ्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री अमृता धोंगडे लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अमृता सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यावरून अमृता लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने हातावर आणि पायावर छान ब्राईडल मेहंदी काढली आहे. त्यामुळे अमृता लग्न करतीये की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अमृता खरंच कधी लग्न करणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मात्र, या प्रकरणी अमृताने कोणतंही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे अमृता खरंच लग्न करणार आहे की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे. दरम्यान अमृता या सीझनच्या शेवट्पर्यंत बिग बॉसच्या घरात टिकून राहिली होती. तिच्या खेळीने तिने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली होती.
अमृताने याआधी झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत काम केले आहे. यामध्ये तिने ‘सुमी’अर्थातच सुमनची भूमिका साकारली होती. मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमुळे अमृता धोंगडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. तर बिग बॉस मराठीमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.