Latest Marathi News

या स्टार क्रिकेटपटूची पत्नी लवकरच देणार गुड न्यूज?

वुमन आयपीएल मधील ती पोस्ट व्हायरल, स्पोर्टस् अँकरवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियातून बाहेर आहे. तो अजूनही त्याच्या दुखापतीतून सावरला नाही. पण तो त्याची पत्नी संजनामुळे चर्चेत आला आहे. कारण सोशल मीडियावर बुमरासंदर्भात एक वेगळीच चर्चा रंगली आहे.


भारतात यावर्षीपासून वुमन प्रीमियर लिग सुरु झाली आहे. या लीगमध्ये बुमराह त्याची पत्नी संजना गणेशन हिचा एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये संजना गरोदर असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.संजना गणेशन या फोटोत बेबी बंपसह कॉमेंट्री करताना दिसून येत आहे. हा फोटो पाहून जसप्रीत बुमराह लवकरच बाबा होणार असा अंदाज लावायला सुरवात केली आहे. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन हे दोघेही मार्च २०२१ रोजी विवाह बंधनात अडकले होते. दरम्यान संजना गणेशन ही क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये स्पोर्ट्स प्रेजेंटरची भूमिका पार पाडताना दिसून येत येते, वुमन प्रीमियर लीगमध्येही ती प्रेजेंटरची भूमिका पार पाडत आहे.दरम्यान या गोष्टीबाबत अजूनही कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये संजनाचा बेबी बंप दिसत असल्याचा अंदाज लावला जात आहे.


संजना गणेशन तिच्या कामात खूपच सक्रिय आहे. ती लग्नानंतरही आठवड्याभरातच कामावर परतली होती. सोशल मीडियावरही ती खूप फोटो शेअर करत असते. त्याचबरोबर ती सुंदर अँकरपैकी एक मानली जाते. दरम्यान दुखापतीपासून पाठ सोडवण्यासाठी बुमराह शस्त्रक्रिया करण्याकरता न्यूझीलंडला रवाना झाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!