Latest Marathi News
Ganesh J GIF

राष्ट्रवादी कोणाची? आयोगासमोर अजित पवार गटाचा मोठा दावा?

पुढील सुनावणी या तारखेला, पहा कोणत्या गटाचा दावा वरचढ, सुनावणीत काय घडलं? वाचा सविस्तर

दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कोणाची? हा वाद निवडणुक आयोगात पोहोचला आहे. आज पहिल्यांदा राष्ट्रवादी फुटीची सुनावणी निवडणुक आयोगासमोर करण्यात आली. निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे चिन्ह यावर शरद पवार आणि अजित पवार गटांकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. आता पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मूळ पक्ष हा आमचाच असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. यावेळी अजित पवार गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आल्याचा दावाही शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. पण सर्वाधिक आमदार आमच्यासोबत आहेत, कोअर कमिटीतील सर्वाधिक सदस्य आमच्यासोबत आहेत असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. आपल्याकडे ४३ आमदार आणि दोन खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवार गटाने केला. आणि त्यामुळेच पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावे असा दावा अजित पवार गटाने केला आहे. यावेळी जयंत पाटील यांची निवड बेकायदेशीर असून शरद पवार आपल्या मर्जीप्रमाणे पक्ष चालवतात असाही दावा अजित पवार यांनी केला आहे. निवडणुक आयोगासमोर दोन तास सुनावणी पार पडली. आता सोमवारी म्हणजे ९ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. तर अजित पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल आणि मणिंदर सिंह यांनी बाजू मांडली. दरम्यान शरद पवार गटाने निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच, चिन्ह गोठवू नये असेदेखील सांगण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन आयुक्त यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.

कोण काय म्हणाले?

अजित पवार गट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ५३ आमदारांपैकी ४२ आमदार आमच्या बाजूने, विधानपरिषदेच्या ९ आमदारांपैकी ६ आमदार आमच्या बाजूने आहेत, महाराष्ट्र, नागालँडमधील आमदार आमच्याकडे, दीड लाख शपथपत्र दाखल केल्याचा अजित पवार गटाचा दावा

शरद पवार गट

अजित पवार गटाने केलेल्या दाव्यावर शरद पवार गटाचा आक्षेप, पक्षातून केवळ एक गट बाहेर पडला आहे पण मूळ पक्ष आमचाच, निर्णय येईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आमच्याकडेच ठेवा, चिन्ह गोठवू नका

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!