Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार?

प्रदेशाध्यक्ष पदासाठी दादांची फिल्डिंग, शरद पवारांकडे भर सभेत केली मागणी, जयंत पाटलांचे काय?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेत असणारे नेते अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजितदादा नाराज अशा बातम्या थांबल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा आपल्या नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी भाकरी फिरवण्याची विनंती करताना आपल्या विधानसभेतील पक्षनेतेपदाच्य पदाच्या जबाबदारीतुन मुक्त करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आक्रमक भाषण करताना ही मागणी केली आहे. ते म्हणाले, “ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल आदी नेते मंडळी स्वबळावर त्यांच्या राज्यात सत्ता आणत असताना राष्चट्रावदी काँग्रेसला ते का शक्य होत नाही, त्यासाठी मी स्वत:  जबाबदारी घेण्यास तयार आहे. संघटनेच्या कामाचा मला अनुभव आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मी ऐनवेळी अनेकांना आमदारकीची उमेदवारी दिली, ते सर्वणज निवून आले. आता मला संघटनेत कोणतही पद द्या त्या पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. मला विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करा, पक्षातील जबाबदारी द्या. संघटनेत कोणतेही पद द्या, त्या पदाला मी न्याय असा शब्द देतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. आता अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. कारण संघटनेत अजित पवारांना त्यांना साजेशी अशी जबाबदारी द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता शरद पवार भाकरी फिरवणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. पण यामाध्यमातुन अजितदादा मुख्यमंत्रीपदासाठी आपली दावेदारी मजबुत करत असल्याचे दिसत आहे.

उद्या जर कुणाला मंत्रीपद पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचबरोबर आपण ज्या जिल्ह्यातून निवडून येतो तिथे तरी एकोपा ठेवला आहे का असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित करत, पक्षातील वरिष्ठ नेत्यांना काम करण्याचा सल्ला दिला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!