…तर शिंदे गटामुळे आगामी निवडणूकीत भाजप हरणार?
शिंदे गटाबद्दलची जनतेची वाढती नाराजी भाजपाची अडचण, सर्व्हेत महाविकास आघाडीला अच्छे दिन?
मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या एकत्र होतील का वेगवेगळ्या होतील यावर राजकीय पक्षांमध्ये मतमतांतरे असली तरीही निवडणुकीची तयारी पक्षांनी सुरु केली आहे. जागा वाटप आणि इतर काही बांबीवर आता चर्चा सुरु झाली आहे. पण त्यातच सकाळ आणि सामने केलेल्या एका सर्व्हेत शिंदे गट आणि भाजपाची चिंता वाढवारी माहिती समोर आली आहे.
सकाळ आणि सामने कोणत्या पक्षाला किती मते मिळतील याविषयीचा कल जाणून घेतला होता. त्या अहवालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाची मोठी अडचण होणार आहे. आज निवडणुका झाल्या तर अर्थातच भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. पण शिंदे गटामुळे ते सत्तेपासून लांब राहण्याची शक्यता आहे. आज निवडणुका झाल्यास भाजपाला एकूण ३३.८ टक्के मते मिळू शकतात, तर एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेला केवळ ५.५ टक्के मते मिळू शकतात. अशा प्रकारे संपूर्ण एनडीएला केवळ ३९.३ टक्के मते मिळू शकतील, असा अंदाज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला सर्वाधिक ४७.७ टक्के मते मिळू शकतात, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. या सर्वेक्षणात काँग्रेसला सर्वाधिक १९.९ टक्के, राष्ट्रवादीला १५.३ टक्के, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १२.५ टक्के मते मिळण्याची आहे, अशी शक्यता सर्व्हेत नोंदविण्यात आली आहे. याशिवाय बहुजन वंचित आघाडीला २.९ टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्षाला ०.७ टक्के, ओवेसी यांच्या पक्षाला एआयएमआयएमला ०.६ टक्के, केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला ०.५ टक्के आणि इतरांना १.७ टक्के मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटात असंतोष वाढत चालला आहे. त्याचबरोबर भाजप अन्याय करत असल्याचीही खंत शिंदे गटातील खासदारांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी जागावाटपात भाजप शिंदे गटाला कमी जागा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीत तणाव होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर शिंदे गटाची वाटचाल कठीण होणार आहे.
सकाळ सामने अजून एक सर्व्हे करत मोदी २०२४ नंतर पंतप्रधान व्हावेत असे वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला असता. मोदींना अधिक पसंती दर्शवली आली आहे. ४२.१ टक्के मतदारांनी हो म्हणत कल दिला आहे. तर नाहीकडे ४१.५ टक्के मतदारांनी आपला कल दर्शवला असून १६ टक्के मतदार तटस्थ आहेत. त्यामुळे लोकसभासाठीचा जनाधार सध्या तरी मोदींकडेच दिसत आहे.