आयपीएल २०२३ स्पर्धा या कारणामुळे रद्द होणार?
कोरोनाचा धोका वाढल्याने बीसीसीआय अलर्टवर, नवीन नियमावली जाहीर
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- सध्या भारतात आयपीएल स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच सामना पाहण्यासाठी प्रेक्षक लाखोंच्या संख्येने मैदानात येत आहेत. पण कोरोनाचा धोका वाढत असल्याने आयपीएलचा हा सिजन रद्द होण्याची शक्यता आहे.
कोरोनाची भिती पाहता बीसीसीआयने खेळाडूंसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. आतापर्यतं यशस्वीपणे ८ सामने पार पडले आहेत. पण देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बीसीसीआय अलर्ट झाली असुन त्यांनी सर्व संघाना महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. मिळालेल्या माहितानुसार, आयपीएल संघाच्या मालकांनी खेळाडूंना हॉटेलच्या रुममधून वारंवार न निघण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय सॅनिटायजर आणि मास्कचा उपयोग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शहरात कोरोनाचा धोका सद्यपरिस्थितीत जास्त आहे तिथे खबरदारीचे आदेश फ्रँचायजींकडून टीमला देण्यात आले आहेत. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसापुर्वी समालोचक आकाश चोप्राला कोरोना झाला होता. अद्याप कोणत्याही खेळाडूला कोरोना झाला नसला तरीही सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी कोरोना असताना आयपीएल स्पर्धा खेळवली गेली होती. मात्र खेळाडूंना बायो बबलमध्ये राहावे लागले होते. आता जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तर बीसीसीआयला बायो बबल शिवाय पर्याय असणार नाही. पण ती परिस्थिती येऊ नये यासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली आहे.
सध्या भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या २४ तासात भारतात ४४३५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे गेल्या २४ तासात छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, ओडिशा आणि पंजाबमध्ये अनुक्रमे प्रत्येकी १ जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत एकूण ४.४७ कोटी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.