Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रसिद्ध इन्स्टा स्टार तरूणीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल

इन्स्टा स्टारच्या नव्या पोस्टने वेधले लक्ष, मॉर्फ व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचलेली रिल स्टार म्हणून सोनाली गुरवला ओळखले जाते. सोनालीचा चेहरा मॉर्फ करून सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याच्या प्रकरणामुळे ती चर्चेत आली आहे. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती.आता तिने एक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोनालीने घडलेल्या वाईट प्रकाराबद्दल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काही जणांना याचा जाबही विचारला आहे. तसेच तिने पोलिसात जाण्याचे धाडस दाखवल्याबद्दल भाष्य केले आहे. तक्रारीचा फोटोही तिने यात शेअर केला आहे. सोनाली म्हणाली “आपला चेहरा मॉर्फ करून सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याची माहिती कळाली. एखाद्या मुलीला ज्या गोष्टीचा नुसता विचारच असह्य होईल, नेमकी ती घटना माझ्या आयुष्यात घडली. पटकन सगळे सोडून कुठेतरी निघून जावसे वाटले, खूप वाईट वाईट विचार येऊ लागले. ही घटना झाल्यापासून सतत माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या समोर यायचा. कौतुकाने बघणाऱ्या नजरा हिणवू लागल्या. सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटले जेव्हा मला अश्लील मेसेज, इमेल्स आणि कमेंट्स येऊ लागल्या होत्या, असे तिने पोस्टमध्ये नमूद केले आहे.याप्रकरणी सोनालीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोनाली गुरवने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ५००, माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम ६५,६६ सी, ६७ ए या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.  हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सोनाली गुरव इन्स्ट्रा क्वीन म्हणून ओळखली जाते. तरूणाईत तिची प्रचंड क्रेझ आहे. सोनालीचे रील्स, व्हिडीओ क्षणात व्हायरल होत असतात दरम्यान सोनालीने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. सोनालीच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!