
मुंबई दि १५ (प्रतिनिधी)- भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संपूर्ण अंबानी कुटुंबाला ३ तासात संपवू असे धमकी देणार आठ फोन करण्यात आले आहेत.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटलमध्ये हा धमकीचा फोन आला होता.याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने डीबी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अँटेलिया प्रकरणानंतर अंबानी कुटुंबियाला दुस-यांदा धमकी देण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या लँडलाईनवर हे फोन आले. सात ते आठ फोन आले ज्या माध्यमातून धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तातडीने प्रकरण हाती घेत तपास सुरु केला आहे. तेव्हा आता क्रमांकाची पडताळणी होताच कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष असेल. रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ”आम्हाला आठ फोन कॉल आले होते. आम्ही या धमकी देणाऱ्या फोन कॉलला गांभीर्याने घेतले असून फोन करणारे दहशतवादी असू शकतात.फोन कॉलची माहिती पोलिसांना तात्काळ दिली. रिलायन्सच्या सुरक्षा रक्षकांनाही याची माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारमुळंही यापूर्वी बराच तणाव निर्माण केला होता. अद्यापही या प्रकरणाच्या घडामोडी सुरु असतानाच पुन्हा एकदा अंबानी कुटुंबाला धमकावणारे फोन आल्यामुळं प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.