Just another WordPress site

कदमवाकवस्ती येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..

पुणे १५ (प्रतिनिधी)-कदमवाकवस्ती येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव आज दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायत कदमवाकवस्ती कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण माननीय गणपत एकनाथ काळभोर माजी सरपंच कदमवाकवस्ती यांच्या हस्ते करण्यात आला व अमृत महोत्सवाचे अवचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांना फळझाडांचे वाटप करण्यात आले.

GIF Advt

यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, उपसरपंच बाबासाहेब काळभोर, पोलीस पाटील प्रियंका भिसे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम, व ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक वर्ग व पालक, अंगणवाडी शिक्षिका, व ग्रामपंचायत सदस्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!