Latest Marathi News

शिंदे गटात सामील होताच नीलम गोऱ्हे आरोग्यमंत्री होणार?

तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे धक्का देणार? भाजपाची नाराजी सावंतांना भोवणारं?, इनसाईट स्टोरी

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- विधान परिषद उपसभापती आणि ठाकरे गटाच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. पण त्यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटातील एका मंत्र्याचे मंत्रीपद धोक्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश हा रिप्लेसमेंट असल्याची चर्चा आहे.

नीलम गोऱ्हे मागील जवळपास ४ टर्म त्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या आमदार होत्या. त्याचबरोबर यंदा त्या उपसभापती देखील होत्या. न्यायालयाने खरी शिवसेना कोणती ते सांगितले असल्याने मी शिवसेनेत आले, असं त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्या शिवसेनेने का आल्या यामागचे संदर्भ पाहिले असता,सुषमा अंधारे यांच्यामुळे त्या आल्या असा अर्थ काढला जात असताना त्यांनी अंधारे यांचा उल्लेख सटरफटर असा उल्लेख केला. त्यानंतर अंधारे यांनी केलेल्या दाव्यामुळे नवीनच चर्चा सुरु झाली आहे. नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेतील एन्ट्रीने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची खुर्ची धोक्यात आली आहे. कारण “तब्बल पाच वेळा विधानपरिषद आणि आता उपसभापती पद भूषवणाऱ्या पुरोगामी (?) नीलमताई, आज वेगळी भूमिका घेत आहेत. त्यांच्या या नवीन प्रवासाला शुभेच्छा आणि भावी आरोग्यमंत्री पदासाठी अॅडव्हान्समध्ये अभिनंदन…!” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे ही चर्चा होत आहे. तसेही भाजपाने शिंदे गटाच्या ज्या ५ मंत्र्यांना काढण्यास सांगितले आहे. त्यात सावंत यांचा समावेश आहे. आणि २०१४ साली देखील गोऱ्हे यांनी आरोग्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे तानाजी सावंत यांची अडचण वाढली आहे.

शिंदे गटात सामील होताच भाजपने नीलम गोऱ्हे यांना मोठं गिफ्ट दिलं. प्रवीण दरेकर यांनी नीलम गोरे यांच्याविरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव आता मागे घेतला आहे. आता आगामी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याचा लवकरच खुलासा होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!