सीमा हैदर या पक्षाकडून लढवणार आगामी लोकसभा निवडणूक?
केंद्रीय मंत्र्यांची सीमा हैदरला पक्षप्रवेशाची ऑफर, प्रवक्तेपदही देणार, फक्त ही अट पूर्ण करावी लागणार?
दिल्ली दि ३(प्रतिनिधी)- आपल्या प्रेमासाठी गदर करून पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर सध्या देशात चांगलीच लोकप्रिय आहे. पण काही दिवसापुर्वी तिच्या कुटुंबांची उपासमार होत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता सीमाचे नशीब पूर्णपणे बदलणार असून सीमाला एकाचवेळी तीन तीन ऑफर आल्या आहेत. त्यामुळे सीमाचे नशीबच पालटणार आहे.
सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्याकडे नोकरीही नव्हती. त्यानंतर त्यांना चित्रपट, नोकरी आणि आता राजकीय पक्षात येण्याची ऑफर मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानच्या उदयपूरमधील कन्हैया लाल साहू याच्या हत्येवर चित्रपट बनवला जात आहे. ज्यामध्ये सीमा हैदर रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. महत्वाचे म्हणजे चित्रपटात सचिन देखील भूमिका साकारणार आहे. दुसरीकडे दोघांनाही नोकऱ्या नसल्याने घरात उपासमार होत असल्याच्या बातम्या आल्यानंतर तिला गुजरातमधील एका कंपनीने नोकरीची ऑफर दिल्याचीही चर्चा आहे. पण या सर्व चर्चेत सीमा आता राजकारणात प्रवेश करणार आहे. एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय) आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सीमा हैदर यांनीही आरपीआयचे निमंत्रण स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. सीमा हैदर यांना पक्षाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा करण्यात येणार असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. यासोबतच त्यांची बोलण्याची शैली लक्षात घेऊन त्यांना पक्षाचे प्रवक्तेही करण्यात येणार आहे. “आतापर्यंत झालेल्या चौकशीत तिच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. जर सुरक्षा यंत्रणांनी तिला क्लीन चिट दिली तर आम्ही तिला आमच्या पक्षात प्रवक्ता बनवू. कारण ती एक उत्तम वक्ता आहे. जर भारताचं नागरिकत्व मिळालं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या चिन्हावर आगामी निवडणुकीतही तिला संधी देऊ” असे पक्षाचे उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी सांगितले आहे. त्यामुळे सीमा लवकरच राजकारणाच्या आखाड्यात दिसण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी महिला सीमा हैदर भारतीय प्रेमी सचिनसाठी सीमा ओलांडून आली आहे. ती गुप्तहेर असल्याचा संशय असल्याने तिची चौकशी केली जात आहे. सीमा हैदर सध्या एटीएसच्या अहवालाची वाट पाहत आहे. त्यानंतर ती पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. सीमा तिचा प्रियकर सचिन मीनासह तिच्या चार मुलांसह ग्रेटर नोएडा येथे राहत आहे.