शिंदे गटातील इतके खासदार लोकसभा निवडणूकीत पराभूत होणार?
भाजपाच्या अहवालामुळे शिंदे गटात अस्वस्थता, यादी समोर आल्यामुळे एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार?
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे महायुतीत जागा वाटपासाठी दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच शिंदे गटाच्या उमेदवारी बाबत भाजपाचा एक धक्कादायक अनुभव समोर आला आहे. त्यामुळे शिंदे गटातील निम्म्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातील त्या खासदारांचा मतदारसंघात नवीन चेहरे शोधावे लागणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील खासदारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.पण दुसरीकडे भाजपाने मात्र शिंदे गटाच्या ५ ते ८ खासदारांना तिकीट न देण्याच्या सूचना केल्याची चर्चा आहे. भाजपाने केलेल्या सर्वेक्षणात मोदींना पाठिंबा दिला आहे. पण बहुशांत ठिकाणी स्थानिक खासदारांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. भाजप सर्वेक्षणानुसार शिंदे गटाचे कृपाल तुमाने (रामटेक), भावना गवळी (वाशिम- यवतमाळ), प्रतापराव जाधव (बुलढाणा), हेमंत गोडसे (नाशिक) सदाशिव लोखंडे ( शिर्डी),हेमंत पाटील (हिंगोली), तर मुंबईतून राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई) व गजानन किर्तीकर (उत्तर पश्चिम मुंबई) यांचा समावेश आहे. यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात यामुळे शिंदे गटात संघर्ष होण्याची शक्यता आहे. दरम्यान या मतदारसंघातील काही ठिकाणी इतर उमेदवारांनी आपल्याला उमेदावारी मिळावी यासाठी चाचपणी सुरु केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना तयारीच्या सूचना दिलेल्या आहेत. विधिमंडळ अधिवेशनानंतर महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा होणार आहे. त्या बैठकीतच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविला जाणार आहे. मात्र, सध्यातरी आम्हाला तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती कृपाल तुमाने यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे भाजपाच्या आदेश मानतात की त्याच शिलेदारांना पुन्हा निवडणुक लढवायला सांगतात हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे. पण भाजपाच्या अहवालामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे. ही अस्वस्थता अधिवेशनापर्यंत कायम राहते की लवकरच तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.