Latest Marathi News
Ganesh J GIF

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार?

हा मतदारसंघही ठरला, पक्षाचे बळ वाढणार, भाजप, महाविकास आघाडीची चिंता वाढली

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- बीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून निवडणूक लढवायची याबाबत चाचपणी सुरु आहे. यामुळे भाजपा बरोबरच महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत.

बीआरएसने आपल्या विस्ताराची सुरुवात नांदेड जिल्ह्यापासून केली. तसेच गेल्या सहा महिन्यांत राव यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. नांदेडपासून ते चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत इतर पक्षांच्या छोट्या-मोठ्या नेत्यांचे सातत्याने पक्षप्रवेश सोहळे सुरू आहेत. सभाही घेतल्या जात आहेत. तसेच राज्यातील अनेक माजी आमदारांनी आणि शेतकरी नेत्यांनी चंद्रशेखर राव यांना पसंती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आपले स्थान आणखी ठळक करण्यासाठी चंद्रशेखर राव नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर येथून लोकसभा निवडणूक लढू शकतात. याशिवाय तेलंगणातूनही ते लढतील, अशी खात्रीलायक माहिती आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर नांदेडमध्ये घेण्यात आले. या शिबिराला महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी २७८ मतदारसंघातले प्रतिनिधी हजर होते. आता त्यांच्या पक्षाने पहिला टप्पा म्हणून महाराष्ट्रातील २८८ मतदार संघात सदस्य नोंदणी अभियान सुरू होत आहे. नागपूर जिल्ह्यात २५ मे पासून हे नोंदणी अभियान सुरू केले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे जर के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवली तर त्यांचा उपयोग त्यांना विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे राव महाराष्ट्रातून निवडणूक लढवून ताकत विस्तारण्याचा प्रयत्न करणार आहेत.

तेलंगाणानंतर के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी जर महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आले, तर शेतीसाठी २४ तास मोफत वीज, मोफत पाणी’ देण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. विशेष म्हणजे अबकी बार किसान सरकार असा नारा त्यांनी दिला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!