फडणवीसांना निवेदन देताना वृद्ध समाज सेवकाला आली चक्कर
चक्कर आल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, निवेदन देत दिला आत्मदहनाचा इशारा
सोलापूर दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेकजण त्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी आलेले वृद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास शहा यांना भोवळ आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सोलापुरातील मानद पशुकल्याण मध्ये सामाजिक कार्य करणारे विलास शिवलाल शहा हे निवेदन देण्यासाठी आले होते. मुळेगाव तांडा रोडवरील सोनाई कत्तलखाना बंद करावी यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देताना अचानक त्यांना भोवळ आली व शहा खाली पडले. यावेळी फडणवीस यांच्या सोबत असलेल्या पोलीसांनी त्यांना तात्काळ उचलत एका खुर्चीवर बसवले तसेच फडणवीस यांनीही लोकांना त्यांना हवा लागू द्या असे म्हणत गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. विलास शहा यांनी कत्तलखाना बंद करावे अन्यथा आत्मदहन करणार असल्याचे इशारा दिला आहे. तसेच कत्तलखान्यामुळे बोरामणी विमानतळाचा विकास होत नाही. तसेच अनेक बांगलादेशी या कत्तलखान्यात काम करत आहेत, हे घुसखोर आहेत असा आरोप, विलास शहा यांनी केला आहे. दरम्यान निवेदन देताना ९६ वर्षीय शहा यांना चक्कर आल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. सोलापुरातील महसुल भवनच्या उद्घाटनसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप खासदार डॉ जय सिद्धेश्ववर महाराज हे सोलापूर येथे आले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महसूल खात्यातील सर्व वरीष्ठ अधिकारी या उदघाटन कार्यक्रमात उपस्थित होते.