
लग्नाच्या अवघ्या तीन वर्षातच अभिनेत्री घेणार घटस्फोट?
करोडपती व्यावसायिकासोबत बांधली आहे लग्नगाठ, शाही पद्धतीने झाला होता विवाह, लग्नाचे फोटो डिलिट
मुख्य – बाॅलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोट घेणार अशी चर्चा आहे. या अभिनेत्रीने ३ वर्षांपूर्वीच एका उद्योगपतीशी लग्न केलं होते. एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे अडचणी येत असल्यामुळे अभिनेत्रीने घटस्फोट घेणार आहे.
अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि तिचा पती सोहेल खटूरिया यांचे वैवाहिक जीवन कठीण काळातून जात आहे. हंसिका मोटवानी हिने २०२२ मध्ये उद्योगपती सोहेल खटूरिया याच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर हंसिका सोहेलच्या घरी राहण्यास गेली आणि सोहेल हा आपल्या आई वडिलांसोबत राहतो. त्यानंतर सोहेलने त्याच इमारतीमध्ये दुसरा एक फ्लॅट घेतला. मात्र, तरीही हंसिकाला काही समस्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून सोहेल व हंसिका दोघेही वेगळे राहत आहेत. हंसिका तिच्या आईबरोबर राहायला गेली आहे, तर सोहेल त्याच्या आई-वडिलांबरोबर राहतो. सोहेलपासून विभक्त होण्याच्या वृत्तांवर हंसिकाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हंसिकाने १८ जुलैपासून तिच्या इन्स्टाग्रामवर कोणतीच पोस्ट केलेली नाही. तसेच तिने स्टोरीही शेअर केलेली नाही. हंसिका अडीच वर्षांनी पतीपासून वेगळी होणार आहे. सोहेलने हे वृत्त खोटे असल्याचं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. पण सोहेलच्या स्पष्टीकरणानंतरही हंसिकाच्या अकाउंटवर दोघांचे फोटो दिसत होते. पण आता तिने लग्न व इतर सर्व फोटो डिलीट केले आहेत. काही दिवसांपूर्वी हंसिकाच्या अकाउंटवर पती सोहेलच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्ट होत्या. तसेच लग्नाचे व व्हेकेशनचे फोटोही होते. ते फोटो आता तिने डिलीट केले आहेत. दरम्यान आता यावर अभिनेत्री हंसिका काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, हंसिकाच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
हंसिका मोटवानी यांनी बाल कलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्या शोचे नाव ‘शका लका बूम बूम’ होते. याशिवाय तिने ‘सिंघम २’ (तमिळ), ‘बोगन’, ‘आंबाला’ सारख्या दक्षिणेकडील चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेत्रीने देखील या अफवांबाबत मौन सोडलेले नाही. अत्यंत शाही पद्धतीने हंसिकाचे लग्न झाले होते.