Latest Marathi News
Ganesh J GIF

विधानसभा निवडणूकीत भाजपा शिंदे गटाची साथ सोडणार?

विधानसभेसाठी भाजप खेळणार हा मोठा डाव, शिंदे गटात धाकधूक

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- भाजपाने आगामी २०२४ ची लोकसभा जिंकण्यासाठी मिशन ४५ ची घोषणा केली आहे.पण आता भाजपाने पुढचे पाऊल टाकत विधानसभेसाठी देखील रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप स्वबळावर सत्ता काबीज करण्याचे नियोजन करत असल्याचे दिसत आहे. पण या मुळे भाजपा शिंदे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे.

भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठीही आत्तापासूनच कंबर कसली आहे. भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघावर आता भाजपचे विशेष लक्ष असणार आहे. म्हणुनच भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विधान परिषदेचे आमदार, राज्यसभा खासदार यांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. विधान परिषद, राज्यसभेच्याच्या सर्व आमदार, खासदारांच्या निधीचा खर्च आता पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून संबंधित मतदारसंघात भाजपा आपले पाय घट्ट रोवू इच्छित आहे. ज्या मतदारसंघात भाजपचे प्राबल्य नाही अशा मतदारसंघात हा निधी खर्च केला जाणार आहे. हा निधी कसा आणि कुठे खर्च करायचा? याचा प्राधान्यक्रम पक्षाची तीन सदस्यीय समिती ठरवेल. त्यासाठी श्रीकांत भारतीय, खासदार डॉ. अनिल बोंडे आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांची समिती निश्चित करण्यात आली आहे. भाजपाच्या रणनितीमुळे महाविकास आघाडीबरोबरच शिंदे गटाची देखील धाकधूक वाढली आहे.

भाजपाने याआधीही मिशन ४५ ची घोषणा करताना शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात जात भाजपाचा उमेदवार निवडणून आणण्याचे ठरवले आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातही भाजपाने प्रचार केला. आता विधानसभेसाठीही तेच धोरण ठेवल्यामुळे शिंदे गटाची साथ भाजपाला नको असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपा शिंदे गटाला कात्रजचा घाट दाखणार का? हे पहावे लागेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!