Latest Marathi News
Ganesh J GIF

दोन देशांच्या सौंदर्यवतींनी केले चक्क एकमेकींसोबतच लग्न

मिस अर्जेंटिना आणि मिस पोर्तो रिको अडकल्या विवाहबंधनात

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट असते. आपल्या प्रेमातील ती एक महत्वाची पायरी असते पण काही लग्न अशी असतात की समाज त्याला मान्यता देत नाही. पण सर्व बंधनांना तोडत दोन देशाच्या सौंदर्यवतींनी एकमेकींसोबत आयुष्यभराच्या आणाभाका घेतल्या आहेत. नुकताच दोन सौंदर्यवतींचा समलिंगी विवाह संपन्न झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२० ची मिस अर्जेंटिना राहिलेल्या मारिआना वरेलाने २०२० ची मिस पोर्तो रिकोने फेबिओला वॅलेंटिनबरोबर लग्नगाठ बांधली. दोघींनी सोशल मीडियावरुन नुकतीच आपल्या विवाहाची घोषणा केली. दोघींनी एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहीत. “आम्ही एकमेकींसोबत असलेलं अनेक महिन्यांचं नातं सर्वांपासून लपवलं, पण २८ ऑक्टोबरच्या मुहूर्तावर ते जगजाहीर करण्याचं ठरवलं, अशी माहिती देत हार्ट, रिंग आणि स्टारचा इमोजी पोस्ट केला आहे. मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२० च्या स्पर्धेत भेट झाल्यानंतर दोघी प्रेमात पडल्या होत्या. पण दोघींनी आपल्या नात्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती. सध्या त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत दोघी सौंदर्यवती एकत्र सुट्टी घालवताना दिसत आहेत. तसंच त्यांच्या प्रपोजची झलकही पहायला मिळत आहे.

वरेलाने २०१९ च्या मिस युनिव्हर्समध्ये अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले होते आणि मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२० मध्ये पहिल्या १० क्रमांकात स्थान मिळवले होते. होला मासिकानुसार तिने विविध उपक्रमांसाठी मॉडेलिंग केले आहे. न्यूयॉर्कमधील ‘मेजर’ या मॉडेलिंग एजन्सीमध्ये काम करणाऱ्या व्हॅलेंटीननेही मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२० मध्येही टॉप १० मध्ये स्थान मिळवले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!