हा नेता असणार २०२४ च्या निवडणूकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
अजित पवारांच्या झालेल्या सर्व्हेत जनतेचा धक्कादायक काैल, या दोन नेत्यात जोरदार फाइट, बघा जनतेचा काैल?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात इच्छुक मुख्यमंत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. अलीकडे अनेक नेत्यांचे वाढदिवस असताना त्यांना शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होताना दिसून येत आहे. पण अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करत सत्तेत सामील झाल्यानंतर सकाळ या वृत्तसंस्थेने केलेल्या सर्व्हेत जनता मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती देईल याची चाचपणी केली आहे.
राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर राज्यातील राजकीय समिकरणं बदलली आहेत. त्यामुळे जनतेचा कलदेखील बदलताना दिसत आहे. सकाळने विधानसभा २०२४ च्या निवडणूकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न विचारत एक सर्व्हे केला होता यात जनतेला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यापैकी एका नेत्याची निवड करायची होती. यावेळी जनतेने धक्कादायक काैल दिला आहे. यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे खुपच मागे असुन देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात अटीतटीची लढाई होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक समीकरणे बदलण्याची किंवा तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाहूया जनतेचा काैल काय?
जनतेचा भावी मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस – २१.९ टक्के
उद्धव ठाकरे – १९.४ टक्के
अजित पवार – ९.५ टक्के
एकनाथ शिंदे – ८.५ टक्के
सुप्रिया सुळे – ८.५ टक्के
अशोक चव्हाण – ६.६ टक्के
बाळासाहेब थोरात – ४.२ टक्के
जयंत पाटील – ३.६ टक्के
सांगता येत नाही – १७.७ टक्के