Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात भरदिवसा पीएमटीबसमध्ये तरूणीचा विनयभंग

पुण्यात नेमकं चाललय काय? महिला, तरुणींवरील अत्याचार सुरूच, पोलीसांसमोर मोठे आव्हान

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. दर्शना पवार हत्याकांड, तरुणीवरील कोयता हल्ला अशा घटना घडल्यानंतर पुणे पोलीसांकडुन काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही पुण्यात एका तरुणीचा बसमध्ये विनयभंग झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

पीएमटी बसने प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी पीएमटीमधून खाजगी शिकवणी करिता गेली होती. तरुणी बसने घरी जात असताना आरोपी तिच्या बाजूला येऊन बसला. आणि त्याने तिच्याबरोबर अश्लील वर्तन करायला सुरुवात केली. तरुणी पौड रस्त्यावर बस थांब्यावर उतरुन घरी जात असताना त्या तरूणाने तिचा पाठलाग केला. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर तरुणीच्या घरच्यांनी वारजे पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात पोस्को तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पुण्यात दिवसाढवळ्या विनयभंगाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलाने हा प्रकार केल्याने याची भीषणता अधिकच असल्याचे दिसून येत आहे. आता पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!