लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात हा पक्ष जिंकणार बाजी?
महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार? नवे सर्वेक्षण समोर, महाविकास आघाडी की महायुती?, कोण मारणार बाजी?
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पण यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुक लढवणार आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार आणि कोणाचा पराभव होणार याची मोठी उत्सुकता असणार आहे. पण आता एक सर्वेक्षण समोर आले आहे. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रातील जनता लोकसभेत कोणाला काैल देईल याचा आढावा घेणारे सर्वेक्षण इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स यांनी मिळून केले आहे. यात मजायुतीला दिलासा देणारी तर महाविकास आघाडीची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांवरील आकडेवारी सादर करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपाला २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला (शिंदे) ४ जागांवर तर राष्ट्रवादीला (अजित) २ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला ९ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे गटाला ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. मतांची टक्केवारी पाहिल्यास यातही भाजपाच आघाडीवर आहे. भाजप ३२ टक्के मतांनी आघाडीवर आहे. त्याचवेळी शिवसेनेला (शिंदे) १० टक्के आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५ टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला १५ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवार गटाला 12 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीचा आणि मागील निवडणूकीची विचार केल्यास भाजपा मागील जागा टिकवेल अशी शक्यता आहे. तर काँग्रेसला मात्र मोठा फायदा होताना दिसत आहे. तर फुटीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाला २३ शिवसेनेला १७ राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेस अवघी १ जागा मिळाली होती. तर एका जागेवर एमआयएमने बाजी मारली होती. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. पण आगामी काळात अनेक राजकीय घडामोडी होणार असल्यामुळे आकडेवारीत बदल होऊ शकतो.