Latest Marathi News
Ganesh J GIF

या प्रकरणामुळॆ बाॅलीवूडमधील ही अभिनेत्री ईडीच्या रडारावर

बाॅलीवूडमध्ये यामुळे मोठी खळबळ, का आले बाॅलीवूड ईडीच्या रडारावर, नक्की प्रकरण काय?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडीने कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि श्रद्धा कपूर तसेच टेलिव्हिजन स्टार हिना खान यांना समन्स बजावले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने याआधी अभिनेता रणबीर कपूरला समन्स बजावले होते. यामुळे बाॅलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन गेमिंगबाबत केंद्र सरकारकडून कठोर भूमिका घेतली जात असून आता ऑनलाइन गेम्सच्या अनेक गोष्टीचा तपास केला जात आहे. याअंतर्गत महादेव बेटिंगची चाैकशी केली जाते. काही दिवसापूर्वी महादेव बेटिंग अॅपचा सुत्रधार सौरभ याच्या दुबईत झालेल्या लग्नात नृत्य सादरीकरणासाठी पैसे घेतल्याचा कपिल शर्मासह हुमा कुरेशीवर आरोप आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी आणखी सुमारे १५ कलाकार आणि अभिनेते ‘ईडी’च्या निशाण्यावर असून, त्यांनाही समन्स बजावण्यात असल्याची माहिती आहे. बेटिंग व सट्टेबाजीशी संबंधित कोणत्याही खेळावर सरकारने बंदी घातली आहे. यामुळे बेटिंगशी संबंधित असलेल्या ऑनलाइन गेम्सवर बंदी आली आहे. मात्र काही अभिनेते आणि अभिनेत्री यांनी परदेशात जाऊन ऑनलाईन गेम संबंधी जाहिराती मध्ये सहभाग घेतला घेतल्याचे उघड झाल्याने ईडीने याप्रकरणी चौकशी सुरू केली असून रणवीर कपूर , कपिल शर्मा हुमा कुरेशी आणि हिना खान हे आता ईडीच्या रडारवर असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अ‍ॅप प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं आहे. दरम्यान चंद्राकर आणि उप्पल यांनी महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अॅप्लिकेशन हे बेकायदा सट्टेबाजीसाठी वापरले असल्याने खळबळ उडाली आहे.

सौरभ चंद्राकर व रवी उप्पल हे या अॅपचे प्रमोटर असून, या कंपनीचा कारभार दुबईतून होत होता. नुकतेच महादेव ऑनलाइन अॅपचा सुत्रधार सौरभ चंद्राकार याचं दुबईत लग्न झाले, व या लग्नावर सुमारे २०० कोटींहून अधिकचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले असून या अॅपचे कामकाज संयुक्त अरब अमिरातीतील मध्यवर्ती मुख्यालयातून होत असल्याचे ईडीच्या चौकशीत उघड झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!