Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या ‘या’ वक्तव्यामुळे महायुतीत राडा होणार?

अजित पवार आणि एकनाथ शिंदेवर टिका, स्वतः च्या पतीच्या खात्याबद्दल नाराजी, बेबी आणि मुलामुळे महायुती अस्वस्थ

पुणे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत असतात. पण कधी कधी त्यांच्या वक्तव्यामुळे फडणवीस आणि भाजपाची पंचाईत होत असते. आता अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला आहे.

पुण्यात श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाई यांचे स्मृतिप्रीत्यर्थ एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना पुणे हे फडणवीस यांचं बेबी असल्याचं म्हटलं आहे. पण या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाना साधल्याची चर्चा आहे. माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यावर विशेष प्रेम आणि लक्ष का आहे?. याबाबत अमृता फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे पुणे हे देवेंद्र फडणवीस यांचं एक बेबी आहे. मुंबई, नागपूर, पुणे ही आपलीच मुलं आहेत, असं विचार करून देवेंद्र फडणवीस चालतात. पुण्यामध्ये अनेक समस्या आहेत. झपाट्याने शहरीकरण झाल्याने अनेक समस्यांकडे लक्ष गेलं नाही. मला देखील अनेकदा वाटतं की, रस्ते अजून छान झाले पाहिजेत. वाहतूक अधिक सुरळीत झाली पाहिजे. मेट्रोमुळे पुण्यातील वाहतुकीमध्ये फरक पडला असून आणखी एक मेट्रो मार्ग तयार होणार असून त्यामुळे देखील पुणेकरांना फायदा होणार आहे, असेही त्या म्हणाल्या. अमृता फडणवीस म्हणाल्या की, या शहरात माझी आजी राहते. त्यामुळे मला इथे आल्यावर माहेरी आल्या सारखं वाटतं. येथील लोक आणि वातावरणाविषयी मला खूप आपुलकी वाटते. त्यामुळे मी दरवेळी इथे आल्यानंतर देवेंद्रजींना येथील कमतरतांबद्दल सांगत असते. काय सुधारणा करणे गरजेचे आहे? तसेच फडणवीस देखील पुण्याकडे तेव्हडचं लक्ष देतात. अशी माहिती अमृता फडणवीस यांनी दिली.पण पुण्यात समस्या आहेत. या वाक्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यास महायुतीत देखील खडाखडी होण्याची शक्यता आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटना दुःखदायी आहे. शहरात, गावात स्त्रियांवर अत्याचार होत आहे. यावर राज्यकर्ते, पोलिस, न्यायालय यांना एकत्रित काम करावे. महिलांना सन्मान देणे गरजेचे आहे, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!