
आधी उद्धव ठाकरेंसोबत असल्याची शपथ पण आज शिंदे गटात प्रवेश
'विशेष' कारणामुळे 'या' नेत्याने घेतला शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- मी सच्चा शिवसैनिक आहे. मी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहणार, असे म्हणणारे उस्मानाबाद शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमचा योग्य सन्मान करु असे आश्वासन दिले. त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
उमरगा लोहारा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चाैगुले यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. आधी शिष्याने शिंदे गटात प्रवेश केला नंतर गुरुला शिष्याने प्रवेश दिला अशी चर्चा रंगली आहे.रविंद्र गायकवाड यांनी विधान परिषद डोळयासमोर ठेवुन प्रवेश केल्याची चर्चा आहे त्यांना किंवा मुलगा किरण गायकवाड यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. १९८५-८६ मध्ये शिवसेनेने मराठवाडयात पाळेमुळे रुजवायला सुरुवात केली होती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचा प्रभाव रविंद्र गायकवाड यांच्यावर झाला यामुळे रविंद्र गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला घरातुनविरोध झाला तरी सुध्दा रविंद्र गायकवाड यांनी शिवसेना सोडली नाही. पण त्याच गायकवाड यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. गायकवाड यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे शिवसेनेला या भागात नवे नेतृत्व उभे करावे लागणार आहे.
चाैगुले यांनी शिंदे गटात प्रवेश करताना गायकवाड यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्या सहमतीनेच ते शिंदे गटात गेले होते. त्यामुळे गायकवाड देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. अखेर विधान परिषदेचा शब्द दिल्यानंतर गायकवाड यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.