Just another WordPress site

जिच्या सोबत लग्नाची चर्चा तिच्यासोबत युवकाने असे काही

'गुडबाय लाईफ' स्टेटस ठेवत युवकाने उचलले धक्कादायक पाऊल

कोल्हापूर दि २१(प्रतिनिधी)- नातेवाईकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर ‘गुडबाय’ असा मेसेज शेअर करत आणि स्टेट्स ठेवत कोल्हापुरातील एका युवकाने मुलीचा खून करत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कागल तालुक्यातील लिंगनूर गावात ही घटना घडली. या घटनेमुळे कागल तालुक्यात खळबळ उडाली आहे.

GIF Advt

ऋतुजा प्रकाश चोपडे असे मृत युवतीचे नाव आहे.तर कैलास आनंदा पाटील याच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि कैलास हे नात्यातील असल्याने एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या लग्नाची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती. लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध होता. त्यामुळे कैलासने ऋतुजाला भेटण्यास बोलविले. तिला घेऊन तो गिरोली घाटात गेला. त्याठिकाणी त्याने तिचा खून केला. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर ‘गुडबाय’ असा मेसेज टाकून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तो मेसेज वाचून नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन तपासून कैलासला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मृत ऋतुजा ही बी. एस्सी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती.

कैलासने मित्रांना मी आत्महत्या करणार आहे. माझा गावात मोठा फोटो लावा असे सांगितले. मोबाईलवर त्याने ‘मला माफ करा. मी जात आहे. गुडबाय लाईफ’ असा स्टेटसही ठेवला होता, याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. पण युवकाने तरुणीचा खून करुन आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!