Latest Marathi News
Ganesh J GIF

‘भाजपा आपला मित्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती नकोच’

उद्धव ठाकरेंसमोरच 'या' खासदाराची शिंदेच्या 'मन की बात'

मुंबई दि २१ (प्रतिनिधी)- आपल्या मुलासाठी शिंदे गटात प्रवेश करण्याचे टाकलेले खासदार गजानन किर्तीकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली खरी पण प्रसार माध्यमांसमोर त्यांनी एकनाथ शिंदेच्या तोंडची भाषा बोलत ठाकरेंना घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे किर्तीकर नेमके कोणाचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी कीर्तिकर इच्छुक असल्याच्या चर्चा होत होत्या. पण अखेर त्यांच्या मुलाला नेतेपद आणि मुलाला खासदारकीचा शब्द दिल्यामुळे त्यांनी शिवसेनेत थांबण्याचा निर्णय घेतला. पण तरीही त्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. कीर्तिकर म्हणाले की,”आता आपली पुढील वाटचाल राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत नको. महाविकास आघाडीचा प्रयोग २०१९ साली झाला आणि तो संपलाही. आपला नैसर्गिक मित्र भाजप आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबतही समेट घडवायला हवा. आता आणखी किती वर्षे एकमेकांशी भांडत राहणार? त्या वादात एकमेकांची डोकी फुटणार, त्यापेक्षा समेट घडवायला हवा,अशी भूमिका त्यांनी मांडल्याने त्यांनी तनसे नसला तरी मनसे एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला असल्याचे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले. आपली आणि भाजपची नैसर्गिक युती आहे, असं सांगत कीर्तिकरांनी उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना लक्ष्य करत जोरदार टिका केली.त्यामुळे त्यांच्याकडून तरी भाजपासोबत युतीसाठी प्रयत्न केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.तर भाजपाने शिंदे गटच अधिकृत शिवसेना असल्याचे जाहिर करुन टाकले आहे.तर ठाकरेंनी अलीकडे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे कीर्तीकरांचा आवाज ठाकरे एैकणार का? की कीर्तिकर वेगळा निर्णय घेणार याची उत्सुकता असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!