पुणे जिल्ह्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
सुसाईड नोटमुळे गुंतागुंत वाढणार, पोलीसांसमोर तपासाचे आव्हान
पुणे दि ९(प्रतिनिधी)- शिरुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या एका महिलेने घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असुन हळहळ व्यक्त होत आहे.
अंजली ज्ञानदेव गायकवाड असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानदेव गायकवाड यांना रोजी दुपारी चारच्या दरम्यान त्यांची मुलगी शलाका सुपेकर हिने फोन करुन अंजली हिने राहत्या घरात सिलींग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर ते त्यांची पत्नी, मुलगी शलाका सुपेकर यांच्यासह शिरुर येथील खासगी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी अंजली गायकवाड हिचा उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी शिरुर पोलिस स्टेशनला धाव घेत फिर्याद दाखल केली. शिरूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
अंजली गायकवाड यांनी आत्महत्या करण्याच्या आधी सुसाईड नोट लिहिली होती. परंतु, शिरुर पोलिसांना ती सापडली नाही. त्यामुळे या प्रकरणात गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.