Latest Marathi News
Ganesh J GIF

पती व प्रियकरासोबत राहण्यासाठी महिलेचा पोलीस स्टेशनमध्ये राडा

नववधूच्या पोशाखातील महिलेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, नेमके काय घडल?

हमीरपूर दि ३(प्रतिनिधी)- उत्तरप्रदेशातील हमीरपूर येथेएका नववधूने पोलीस ठाण्यात जाऊन चांगलाच गोंधळ घातला. महिला इतकी रागात होती की तिला हाताळताना पोलिसांना घाम फुटला.महिलेने सीईओ कार्यालयात जाऊन खुर्च्या तोडल्या ,मोबाईल फोडला, नंतर आरडाओरड केली. दोन महिला हवालदाराने तिला पकडण्याच्या प्रयत्न केला. मात्र महिलेचा धिंगाणा सुरु होता. धिंगाण्यामागचे कारण देखील डोके चक्रावणारे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला ही आधिच विवाहीत आहे. २२ फेब्रुवारी रोजी तिचे लग्न झाले. मात्र लग्नानंतरही ती आपल्या प्रियकरासोबत बोलत होती. या बाबत महिलेच्या पतीला देखील माहित होते. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांना या बाबत तक्रार देण्यात आली. त्यामुळे महिलेने पळून जाऊन प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिलेने पतीला फोन कारून पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. पण पती त्या महिलेच्या आई वडीलांसोबत आल्याने महिला संतापली तिला पतीसह प्रियकरासोबत देखील राहायचे होते. त्यामुळे ती एवढी हट्टाला पेटली की रागाच्याभरात तेथील एका पोलीस कर्मचारी महिलेचा फोन देखील ती जोरात खाली आपटते. बराच वेळ महिलेची समजूत काढल्यानंतर या वादावर पडदा पडला. महिला मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या महिलेने वधूच्या वेषातच जोरदार राडा घातला. त्यावेळी नेमकी पोलिसांची पत्रकार परिषद सुरु असल्याने त्या महिलेचा धिंगाणा कॅमे-यात कैद झाला आहे.

हे प्रकरण हमीरपुरातील आहे. जिल्ह्यातील राठ पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीतील बसेला गावातील रहिवासी असलेल्या अनिल शर्मा या तरुणाचे लग्न झाशी जिल्ह्यातील चिरगाव येथील तरुणीशी गेल्या वर्षी २२ फेब्रुवारी रोजी झाले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!