पुणे रेल्वे स्थानकावर महिलेचा तोल गेला आणि….
अपघाताचा व्हिडिओ व्हायरल, आरपीएफ जवानाने केले असे काही..
पुणे दि ४(प्रतिनिधी)- पुणे रेल्वे स्थानक कायम गजबजलेले असते. तिथे प्रवाशांची कायम वर्दळ असते. अशा पुणे रेल्वे स्थानकवर नवीन वर्षात एक मोठा अपघात होता होता टळला आहे. एका महिलेचा रेल्वे पकडताना तिचा तोल गेला आणि ती महिला खाली कोसळली. परंतु, सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत त्या महिलेला वाचवले आहेत.
एक महिला आपल्या मुलीसोबत धावती रेल्वे पकडण्यासाठी घाईगडबडीत पळत होती. पण अचानक तोल ढासळल्याने ती महिला खाली घसरली. त्यामुळे महिलेचा एक पाय रेल्वेखाली अडकला आणि एक पाय रेल्वेवर होता. ती महिला रेल्वेखाली जाईल असे वाटत असतानाच आरपीएफ जवानाने प्रसंगावधान राखत महिलेला बाहेर खेचल्याने तिचा जीव वाचला आहे. मात्र महिलेच्या पायाला मोठी दुखापत झाल्याने,तिला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यस घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
विनोद मीना असे त्या महिलेला वाचवलेल्या जवानाचे नाव आहे.प्रगती एक्सप्रेस या रेल्वेने ही महिला आणि तिच्या दोन मुली मुंबईला निघाल्या होत्या पण दुर्देवाने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक स्थानकावर असे अपघात घडत असतात त्यामुळे प्रवाशांनी काळजी घेणे गरजेचे आहे.