Latest Marathi News
Ganesh J GIF

‘तुंबलेली गटारं आणि रस्त्यांऐवजी ‘लव्ह जिहाद’ कडे लक्ष द्या’

भाजपच्या मोठ्या नेत्याचे धक्कादायक वक्तव्य, नेत्यांच्या हत्येबाबत धक्कादायक खुलासा

बंगळूर दि ४ (प्रतिनिधी) – आज काल समाजात नागरिकांच्या मुलभूत मुद्द्यांपेक्षा भलत्याच मुद्द्यांवर जोर दिला जात आहे त्यातच भाजपाचे कर्नाटकातील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नलिन कुमार कतील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.त्यामुळे भाजपा अडचणीत आली आहे. कर्नाटकात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करतानाचा त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मंगळुरुमधील ‘बूथ विजय अभियान’ कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना नलिन कुमार कतील म्हणाले की, “तुम्ही लोकांनी आता रस्ते, गटारे, नाले आणि अन्य छोट्या गोष्टींबद्दल विचार किंवा चर्चा करता कामा नये. तुमच्या मुलांच्या आयुष्याशी संबंधित मुद्दे म्हणजेच लव्ह जिहादला थांबवायचं असेल तर आपल्याला भाजपाची गरज आहे,” असे विधान कातील यांनी केले आहे. त्याचबरोबर “पीएफआयवर बंदी घालण्याआधी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल सदृश्य परिस्थिती होती, आज पीएफआयवर बंदी घालण्यात आली नसती तर मंचावर भाजपाचे नेते मोनप्पा भंडारी, आमदार वेदव्यास कामथ आणि हरि कृष्ण बंटवाल आपल्यात नसते त्यांच्या केवळ फोटोंना हार घातलेलं दिसले असते, असे धक्कादायक वक्तव्य कतील यांनी केले आहे.

कर्नाटक काँग्रेसने कतील यांच्या या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट करत टिका केली आहे. “राज्याचा विकास, रोजगार आणि शिक्षण हे सर्वसाधारण मुद्दे आहेत. हे फार लज्जास्पद आहे की भाजपाने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विकासाबद्दलच्या चर्चा करु नये असे त्यांनी म्हटले आहे. मुळातच भाजपाने विकास कमी केला आहे, असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!