अनिल परब यांची इतक्या कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त
परबांच्या मागे ईडीची पीडा, कारवाई अनिल परबांवर मात्र अडचणीत उद्धव ठाकरे
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांच्या ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.अनिल परब यांच्या १० कोटी २० लाखांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असणार आहे.
ईडीकडून अनिल परब यांनी अनेकदा चौकशी झाली होती. तसेच साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं सात ठिकाणी छापेमारी देखील केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्टप्रकरण लावून धरले होते. त्यांनी याबाबत ईडीकडे तक्रार केली होती. साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने सात ठिकाणी छापेमारी देखील केली होती.जप्त करण्यात आलेली मालमत्ता ही जमिनीच्या रुपात आहे, साधारणपणे ४२ गुंठे जागा जप्त करण्यात आली आहे.त्याची किंमत २ कोटी ७३ लाख ९१ हजार इतकी आहे. याच जागेत बांधण्यात आलेलं साई रिसॉर्टही ईडीनं ताब्यात घेतलं आहे. या रिसॉर्टची किंमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार इतकी आहे. अनिल परब हे मातोश्रीच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. मालमत्ता जप्त केल्यानंतर ईडी आता परबांवर अटकेची कारवाई करण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्यसवेळीही ईडीने अगोदर संपत्ती जप्त केल्यानंतर अटक केली होती. अनिल परबांना अटक झाल्यास उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ईडीनं या कारवाई संदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. दरम्यान अनिल परब यांनी मात्र या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार आहे, असं अनिल परब यांनी म्हटले आहे.