Latest Marathi News
Ganesh J GIF

‘हा’ घिबली फोटो शेअर केल्याने IAS महिला सचिवाची अचानक बदली

विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने राज्य सरकारची कारवाई, कमी वयात अधिकारी होण्याचा आहे बहुमान

हैद्राबाद – दराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीजवळील ४०० एकर जमिनीवरील झाडे तोडल्याबद्दल AI च्या मदतीने बनवलेली घिबली इमेज सोशल मीडियावर रि-शेअर केल्याबद्दल पोलिसांनी अलिकडेच समन्स बजावलेल्या वरिष्ठ आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल यांची बदली करण्यात आली आहे.

तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. याचा संदर्भ घेत स्मिता सभरवाल यांनी ३१ मार्च रोजी जेसीबी आणि इतर यंत्र, दोन हरीण आणि एक मोराचे चित्र दिसणारे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे पोलीसांनी कलम १७९ बीएनएस अंतर्गत नोटीस बजावली होती. यानंतर सायबराबाद पोलिसांसमोर हजर झालेल्या सभरवाल यांनी ‘selective targeting’ म्हणत या नोटीसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. २००१ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या सभरवाल यांनी विचारले होते की, हीच पोस्ट पुन्हा शेअर करणाऱ्या २००० व्यक्तींविरुद्ध अशीच कारवाई करण्यात आली आहे का? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला होता. सभरवाल या सध्या युवा प्रगती, पर्यटन आणि संस्कृतीच्या विशेष मुख्य सचिव आणि पुरातत्व संचालक म्हणून काम पाहात होत्या. आता त्यांची तेलंगणा वित्त आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. बीआरएसच्या सत्ताकाळात त्या मुख्यमंत्री सचिव म्हणून काम पाहत होत्या. सभरवाल यांच्यासह २० अधिकाऱ्यांची यावेळी बदली करण्यात आली आहे. दरम्यान कांचा गचिबोवलीतील जमीनी संदर्भात तेलंगणा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कारण विद्यार्थी गट आणि पर्यावरण प्रेमींनी प्रस्तावित विकासाला विरोध दर्शवला आहे.

स्मिता सभरवाल अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत स्मिता सभरवाल या भारतातील सर्वात तरुण महिला IAS अधिकारी बनल्या होत्या. त्या आता तेलंगणा वित्त आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!